सालाईवाडा येथील ललित परब या युवकाचे उपचारादरम्यान निधन.
सावंतवाडी
सालाईवाडा येथील रहिवासी ललित परब वय वर्ष 30 या युवकाचे आज सायंकाळी उपचारा दरम्यान निधन झाले आहे आज सकाळी त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये रवी जाधव व निखिल जाधव यांच्या सहकार्याने अधिक उपचारासाठी दाखल केले होते त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक होती त्यामुळे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
उद्या त्यांना सकाळी दहा वाजता सावंतवाडी स्मशानभूमी मध्ये त्यांना आणून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात येणार आहे तरी त्यांचे कोणी नातेवाईक किंवा मित्र मंडळी असतील तर त्यांनी रवी जाधव यांच्याशी संपर्क साधून या साठी सहकार्य करावे अशी विनंती रवी जाधव यांनी केली आहे.
