*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य तथा अध्यक्ष कोमसाप सावंतवाडी लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित अप्रतिम गझल*
*(मंजूघोषा वृत्त)*
*”उन्माद”*
पावसाने मांडला उच्छाद आहे
गांजला राजा बळी निष्पाप आहे
जर कडाडत येतसे सौदामिनी तर
वागणे भासे जसा उन्माद आहे
कापलेले धान कुसले, कोंब फुटले
घेतला कोणी, कुठे आस्वाद आहे
का करावी पेरणी, शेती म्हणालो
ना कुणी म्हणतील, मी अपवाद आहे
तू दिले अन् झेलले ते वार कितिसे
पचविण्या मी दुःखही निष्णात आहे
🖊️दीपक पटेकर (दीपी)
सावंतवाडी
८४४६७४३१९६
