*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*निर्माल्य…माझ्या जगण्याचं…!*
झाडाचं पान आत ..दुमडलं
की मी ही… अंतमृख होतो
सुकलेल्या पानांनी पाठ दाखवली
मी ही तळवे उघडून दान मागतो
हिरवं चैतन्य झाडाचं जस मंदावत
तसा माझा चेहरा फिक्कट होत जातो
जख्खड पानांत अनाहत नाद शिरला
तसा मीही माणूसपण गमावत जातो
झाडाच्या बुंध्याशी जमलेल्या पानगळीत
माझा राग ..लोभ ..क्रोर्य दडवून घेतो
लाजून अनावृत्त ..शरीर झाकून घेत
व्रतस्थ होऊन बुंध्याशी निर्माल्य होतो
कालखंड पानगळीचा पदरी बांधून
ओळखीच्या नजरेने ईश्वराला पाहतो
निराकारात भावखुणा पुसत पुसत
मातीत ..स्वतःला झाकून घेतो..!!
बाबा ठाकूर
