You are currently viewing नामाचा महिमा

नामाचा महिमा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*नामाचा महिमा*

 

*प्रतिमा* कशी असावी

स्वच्छ निर्मळ नितळसुंदर

*प्रतिभा* अगाध असावी

प्रखर प्रतापी प्रगल्भ असावी

*आशा* *आकांक्षा* काय आहे

एकच *आशा* आहे

दुसरी *आकांक्षा* नकोय

*भुमिका* काय आहे

जी मिळेल तिची *प्रतिक्षा* आहे

*भावना* कुठे आहे

*श्रध्देच्या* आसपास आहे

*प्रेरणा* कुठून मिळाली

गुरूंच्या सहवासातून

*साधना* कठीण वाटते

*आराधना* पण कठोर आहे

*तपस्या* फळाला आली

*पुजा* *अर्चना* कामी आली

*देविका* प्रसन्न झाली

*प्रार्थना* सफल झाली

हा नामाचा *महिमा* आहे

 

कवी:-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर ,धुळे.*

७५८८३१८५४३.

८२०८६६७४७७.

प्रतिक्रिया व्यक्त करा