देवगड येथे युथ फोरमतर्फे आयोजित राज्यस्तरीय रंगोली प्रदर्शनास आमदार निलेश राणे यांची भेट; सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांचे कौतुक
देवगड :
“रंगोली प्रदर्शनासारखे उपक्रम युवकांमध्ये सर्जनशीलतेचा उत्साह वाढवतात आणि युवकांमध्ये ऊर्जा निर्माण करतात. हे उपक्रम नियमितपणे आयोजित करणे गरजेचे आहे,” असे मत शिवसेना नेते व कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केले.
युथ फोरमच्या राज्यस्तरीय रंगोली प्रदर्शन या उपक्रमामध्ये आमदार राणे यांनी उपस्थित राहून भेट दिली. बुधवारी सायंकाळी देवगड हायस्कूलमधील गुरुदक्षिणा प्रेक्षागृहात झालेल्या या प्रदर्शनाला त्यांनी भेट दिली.
यावेळी शिवसेना उपनेताजी संजय आंग्रे, तालुकाप्रमुख विलास साळसकर, नगराध्यक्ष साक्षी प्रभू, संदेश सावंत पटेल, अमोल लोके, तसेच युथ फोरमचे अध्यक्ष अँड. सिद्धेश माणगांवकर उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर आमदार राणे यांनी युथ फोरमच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला व विविध उपक्रमांचे कौतुक केले. त्यांनी सांगितले, “रंगोली स्पर्धा, प्रदर्शन यासारखे उपक्रम राबवून ही संस्था युवकांना योग्य दिशा देत आहे. शिवसेनेसाठी ही संस्था तरुणांना दिशा देणारी ठरली आहे. माझे वडील व मी स्वतः या संस्थेतून राजकारणात आलो. ही संस्था युवकांचे नेतृत्व तयार करणारी आहे. युवकांनी या संस्थेत काम केले, तर नक्कीच बदल घडवता येईल.”
या वेळी संजय आंग्रे आणि अँड. सिद्धेश माणगांवकर यांनीही विचार मांडले. कार्यक्रमात प्रणव नलावडे, सागर गावकर, श्रुती माणगांवकर, ओंकार सारंग, आज्ञा कोयंडे, संयम सोमन, वैभव करंगुटकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन ऋत्विक धुरी यांनी केले.
