You are currently viewing युवा महोत्सवाचे  6 नोव्हेंबर रोजी आयोजन

युवा महोत्सवाचे  6 नोव्हेंबर रोजी आयोजन

युवा महोत्सवाचे  6 नोव्हेंबर रोजी आयोजन

 

  • जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची प्रमुख उपस्थिती
  • ‘सांस्कृतिक व नवोपक्रम’ यावर्षीची संकल्पना
  • 5 नोव्हेंबर पर्यंत गुगल लिंकवर नोंदणी करावी

  सिंधुदुर्गनगरी

क्रीडा विभागामार्फत दरवर्षी युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. सन 2025-26 या वर्षातील युवा महोत्सव जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली 6 नोव्हेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव जिल्हा नियोजन समिती हॉल, सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आला असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी कळविले आहे.

             राष्ट्रीय युवा महोत्सव सन 2025-26 मध्ये संकल्पना आधारित बाबींसाठी “सांस्कृतिक व नवोपक्रम” “Cultural and innovation Track” ही संकल्पना दिलेली आहे. या संकल्पनेवर आधारित जिल्हा युवा महोत्सवात विविध स्पर्धात्मक बाबींचे आयोजन करण्यात येणार आहे.  जिल्हास्तरावरील स्पर्धक/संघ विभागीय स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत.       जिल्हास्तरावरील युवा महोत्सवाची नियमावली https://forms.gle/Sd6a8EtLMd8aSYzJ8 या गुगल लिंकवर देण्यात आलेली आहे. युवा महोत्सवामध्ये सहभागी  होण्यासाठी नाव नोंदणी गुगल लिंक फॉर्ममध्ये भरण्यात यावी.

            जिल्‍हास्तर युवा महोत्सवामध्ये जिल्ह्यातील 15 ते 29  वयोगटातील युवक युवतींना सहभागी होता येईल. या स्पर्धामधील प्रथम तीन विजेत्यांना रोख बक्षीस दिले जोणार आहे. युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी आपली नाव नोंदणी 5 नोव्हेंबर, 2025 पूर्वी गुगल लिंकवर करावी. दि. 5 नोव्हेंबर, 2025 पर्यंत प्रवेक्षिका फॉर्म भरावा. जिल्ह्यातील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय/वरिष्ठ महाविद्यालयातील व कृषी महाविद्यालय, इंजिनिअरींग कॉलेज, वैद्यकीय महाविद्यालय व औद्योकिग प्रशिक्षण संस्थेतील जास्तीत जास्त युवक, युवती संघानी, महिला मंडळांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हास्तरीय युवा महोत्सव आयोजन समितीद्वारे करण्यात आले आहे.

  1. सांस्कृतिक- अ)लोकनृत्य सहभाग संख्या 10, साथ सांगत स्वतंत्र ब) लोकगीत सहभाग संख्या 10, साथ सांगत स्वतंत्र 2. कौशल्य विकास- अ) कथालेखन (वैयक्तिक) ब) कविलालेखन (वैयक्तिक) क) चित्रकला (वैयक्तिक) ड) वक्तृत्व 3. संकल्पना आधारित स्पर्धा अ) विज्ञान प्रदर्शन स्थानिक शेतीलमधील शोध प्रकल्प

प्रतिक्रिया व्यक्त करा