You are currently viewing व्यथीत रातराणी

व्यथीत रातराणी

*ज्येष्ठ कवी मोहन मराठे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*”व्यथीत रातराणी”*

 

बहललेली रातराणी

जी कधी गजराच वाटे

गंध सुगंधी आसमंती

मन तसे मोहरुन जाते. /१/

 

वेणीलाही कळलाच नाही

गंध फुल निर्माल्य वाटे

कोण कसा मोहरुन जातो

रातराणी ला गूढ वाटे. /२/

 

मोग-याच्याही गज-यात आहे

दोन भासांच्या दोन व्यथा

एक जाई ईश्वर चरणी तर,

गल्लीतल्या खोलीत दुसरा

पायदळी तुडवून आहे. /३/

 

कोमल सुमनांच्या अंगावरुनी

अनेक भ्रमर फिरत आहेत

कळी बिचारी,मना विचारी

माझाही शेवट असाच आहे?

 

रचना:— मोहन मराठे

प्रतिक्रिया व्यक्त करा