*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*दिवाळीचा अभ्यास..*
(बाल कविता)
—————————
सुट्टी आधी
वहिच्या पानभर
दिवाळीचा अभ्यास
लिहा भराभर
निबंध, शुद्धलेखन
गणिते शंभर
मग लावा
इतिहासाचा नंबर
डिक्शनरी रोज
हातात धरा
अवघड स्पेलिंग
पाठ करा
वाचा थोडी
थोरांची चरित्रं
मित्राला पाठवा
छानसं पत्रं
विज्ञानाचे प्रयोग
घरात करा
रोजचा पेपर
हाती धरा
सोडवा पुन्हा
सहामाही पेपर
सूत्रे, प्रमेये
शिका वापर
कवितांना लावा
नवीन चाली
सुट्टी सारी
संपत आली
आज नको
उद्या पाहतो
अभ्यास सारा
तसाच राहतो
श्रीनिवास गडकरी
पुणे

