जिल्हा प्रशासन, शल्यचिकित्सक विभाग व ग्रामीण रुग्णालय देवगड यांच्या संयुक्त उपक्रमास दिव्यांग लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शिबिरास चांगली प्रसिद्धी मिळाल्याबद्दल तहसिलदार पवार यांनी सर्वांचे आभार मानले
देवगड :
देवगड तालुक्यात एकूण ९५८ दिव्यांग लाभार्थी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांजकडून संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळसेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेत आहेत. या पैकी UDID (Unique Disability ID Card) ५७९ कार्ड असलेले लाभार्थी असून UDID (Unique Disability ID Card) ३७९ कार्ड नसलेले लाभार्थी एवढे आहेत.
दिव्यांग कल्याण विभाग यांजकडील शासन परिपत्रक क्रमांक दिव्यांग-२०२४/प्र.क्र.८६/दि.क.२ दिनांक २७ जून, २०२४ अन्वये केंद्र शासनाच्या धर्तीवर दिव्यांगत्वासंदर्भातील सर्व लाभ मिळविण्यासाठी वैश्विक ओळखपत्र (Unique Disability Identity Card-UDID Card) हे बंधनकारक करणेत आलेले आहे.तसेच सर्व दिव्यांग लाभार्थ्यांची पडताळणी करुन त्यांची पात्र/अपात्रता तपासणी करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत.
त्यानुसार शल्यचिकित्सक सिंधुदुर्ग यांचेशी समन्वय साधून जिल्हा प्रशासन व जिल्हा शल्यचिकित्सक सिंधुदुर्ग यांनी संयुक्तरित्या तालुका स्तरावर मंगळवार दिनांक २८/१०/२०२५ रोजी सकाळी ११.०० ते १.०० यावेळेत UDID नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास दिव्यांग लाभार्थ्यांनी उत्सफुर्त प्रतिसाद देत सहभाग घेतला होता.
या करीता जिल्हा रुग्णालय ओरोस येथील डॉ. बाळासाहेब एस. जोशी, नेत्र शल्य चिकित्सक वर्ग-१, जि. रु. सिंधुदुर्ग., डॉ. निखिल अवधुत, वैद्यकिय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी,डॉ. सचिन डोंगरे, वैद्यकिय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय, कणकवली, डॉ शाम राणे, वैद्यकिय अधिकारी, जि. रु. सिंधुदुर्ग, डॉ मेघनाथ लेले, वैद्यकिय अधिकारी, जि.रु. सिंधुदुर्ग, श्रीम योगिता शिंदे, फिजिओथेरेपिस्ट, जि. रु. सिंधुदुर्ग, श्रीम रेश्मा भाईप, मनोविकृती समोपदेष्टा, जि. रु. सिंधुदुर्ग, श्री श्रीधर पोवार, स्पिचथेरेपिस्ट, जि. रु. सिंधुदुर्ग., श्री प्रविण पाटील, ऑडिओलॉजिस्ट, जि. रु. सिंधुदुर्ग, श्रीम शिवानी चिवटे, नेत्रचिकित्सा अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, देवगड., श्रीम दिव्या आठवले, नेत्रचिकित्सा अधिकारी, पडेल, श्री विजय पवार, एक्सरे टेक्निशिअन, जि.रु.सि.,श्रीम सोनम राणे/श्रीम पुनम गावडे मनोविकृती अधिपरिचारिका, जि.रु. सिंधुदुर्ग, श्री विजय जाधव, केस रजिस्ट्री असिस्टंट, जि. रु.सि. ऑनडयुटी वाहनचालक, ग्रामीण रुग्णालय, पेंडूर-कट्टा वैदयकीय पथकाने उपिस्थित देवगड ग्रामिण रूग्णालयात दिव्यांग UDID नोंदणी सहभागी होत शिबिर यशस्वी केले.
शिबिर यशस्वी होण्यासाठी ग्रामीण रुग्णालय देवगडचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रकाश पाटोदेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय विटकर, डॉ. निनाद धुरी, डॉ.अमित कदम, डॉ. रूपाली पोकळे अधिपरिचारिका निशा जाधव, माणिक महाडिक, समीक्षा सावंत, ज्योत्स्ना धुरी, अधिपरीचारक अविनाश कर्नाळु, शिपाई श्री बेळणेकर, श्री मुंडे, श्रीम शिल्पा कुंभार, श्रीम.पुरळकर , समुपदेशक श्री स्वप्निल मोरे, श्री श्रीपाद मोरये, लिपिक श्री अमर शिर्के, संजय गांधी नायब तहसिलदार संतोष खरात आणि महसूल कर्मचारी वर्गाने विशेष मेहनत घेतली.
प्रिंट मेडिया तसेच डिजिटल मीडिया प्रतिनिधी आणि वार्ताहर यांच्यामुळे देवगड शिबिरास चांगली प्रसिद्धी मिळाल्याचे तहसिलदार पवार यांनी सांगून सर्वांचे जाहिर आभार मानले आहेत.
