मालवण :
शिवसेना प्रमुख नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार निलेश राणे यांच्या सहकार्याने शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी शिवसेनेच्या संघटनात्मक नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
मालवण तालुक्यातील पोईप येथील युवा उद्योजक पंकज गणेश वर्दम यांची शिवसेना मालवण तालुका संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांद्वारे पक्षसंघटनाला नवे बळ दिले आहे. त्यांनी सर्वांना पक्षात सामावून घेताना समतोल राखत अनेक नियुक्त्या दिल्या असून, यामुळे शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत होत असल्याचे सांगण्यात आले.
या वेळी छोटू ठाकूर, सुधीर साळसकर, बाबू परब, शहर संघटक राजू बिडये, प्रशांत परब, बाळा राऊत, शिवराम पालव, नारायण धुरी, भाऊ मोर्जे, संपर्कप्रमुख राजेश गावकर, विनोद भावे यांच्यासह शिवसेनेचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
