You are currently viewing राज्य नेमबाजी स्पर्धेत सावंतवाडीचा आयुष पाटणकर अव्वल — महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व राष्ट्रीय स्पर्धेत
CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 90?

राज्य नेमबाजी स्पर्धेत सावंतवाडीचा आयुष पाटणकर अव्वल — महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व राष्ट्रीय स्पर्धेत

सावंतवाडी :

महाराष्ट्र राज्य क्रीडा आणि युवक संचालनालय यांच्या वतीने दि. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी नागपूर येथे घेण्यात आलेल्या १९ वर्षाखालील राज्यस्तरीय शालेय नेमबाजी स्पर्धेत सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचा विद्यार्थी आयुष दत्तप्रसाद पाटणकर यांनी प्रथम क्रमांक मिळवित सुवर्णपदक पटकाविले. आता तो राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करणार आहे. नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत आयुष्याने ४०० पैकी ३७९ गुण मिळविले.

यापूर्वी असोसिएशनच्या झालेल्या स्पर्धेत तो राष्ट्रीय खेळाडू म्हणून घोषित झाला असून तो गेली ३ वर्षे राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेत आहे. गतवर्षी त्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुणवंत खेळाडू हा पुरस्कार मिळाला होता. गतवर्षी कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत आयुष्याने ४०० पैकी ३७८ गुण मिळवून सुवर्ण पदक पटकाविले होते. तसेच या वर्षीही विभागीय स्पर्धेत त्याला सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे. त्याच्या या यशासाठी त्याचे वडील दत्तप्रसाद याने फार कष्ट घेतले. त्याने केलेल्या या कामगिरीबद्दल त्याची राज्यातून ऑलिम्पिक स्पर्धेसाठीही निवड झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याची मान उंचावणाऱ्या या घटनेबद्दल माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपा महिलाध्यक्ष श्वेता कोरगावकर, भाजपाचे युवा नेते विशाल परब, माजी आमदार राजन तेली, परशुराम उपरकर, माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, अनारोजीन लोबो, ऍड. दिलीप नार्वेकर,श्वेता शिरोडकर, माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, संस्थेचे अध्यक्ष खेम सावंत भोसले, शुभदादेवी भोसले, लखम राजे भोसले श्रद्धादेवी भोसले आणि प्राचार्य, सिंधुदुर्ग पर्यटन महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर, तालुकाध्यक्ष जितेंद्र पंडित, जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध अष्टपुत्रे, तसेच शूटिंगच्या सर्व पदाधिकारी यांनी आयुषचे अभिनंदन केले आहे. त्याला सावंतवाडी येथील उपरकर शूटिंग चे कांचन उपरकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. आयुष्यच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा