*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*शाळेच्या बाकावर…ती..!!*
इतकी वर्ष उलटूनही
अजूनही शाळेच्या बाकावर..
ती माझी वाट पाहते…..
सार चुकतयं माझं!मलाही कळतं
तरीही पुनः पुनः कां चुकावसं
वाटते…..!!
ठरवलं ..अनेकदा मी..
तिच्यावर कविता करायची नाही
कितीदा सांगितलं …तिला मी..
ती काही बाकावरून उठत नाही..!
ते ….काय होत…आज ही
तेही …उमजलं नव्हतं..
प्रेम होत कां..नक्की काय होतं
त्याकाळी.. तेही कळत नव्हतं..!
बालबोध वळणाची कवितेची ओळ
आजही रेंगाळते माझ्यासाठी
वर्गात गायची मधुर कविता
बालपणाच्या भोळ्या गोष्टी..!
बुजलेली बावळट बिचारी
माझ्याकडे बघत राहायची
चोरून मीही तिला बघायचो
मलाही ती खूप आवडायची..!
मऊशार झुल घातली
तिने माझ्या …बालपणावर
आजही ..तिचा गोड चेहरा
मनाच्या लख्ख बिलोरी आरश्यावर
शाळेपुढून आजही जातांना
बाकावर ती बसली असते..
शाळातरं कधीच सुटली..
आजही बाकावर माझी वाट पाहते
घंटानाद झाला!प्रार्थना सुरू झाली
ती माझी…….वाट बघते!!!!
इतकी वर्ष उलटून गेलीत
आजही ती शाळेच्या बाकावर
…..माझी वाट पाहते…..
बाबा ठाकूर
