You are currently viewing प्रांताधिकारी हेमंत निकम यांची बदली, पदोन्नतीने पुण्यास नियुक्ती

प्रांताधिकारी हेमंत निकम यांची बदली, पदोन्नतीने पुण्यास नियुक्ती

सावंतवाडी :

सावंतवाडी येथील प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या कामाची दखल घेत शासनाने त्यांची पदोन्नती करून अप्पर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांना उपसंचालक, भूमी अभिलेख, जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे येथे पदोन्नतीने बदली देण्यात आली आहे.

निकम यांनी प्रशासक म्हणून गेल्या दीड वर्षांपासून वेंगुर्ले व सावंतवाडी या तालुक्यांतील कामकाज पाहिले. विकासकामे मार्गी लावणे, जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणे, तसेच प्रशासनातील पारदर्शकता यामुळे त्यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. त्यांच्या या कार्याचा गौरव करत राज्य शासनाने त्यांना पुणे येथे अप्पर जिल्हाधिकारी पदावर पदोन्नतीने बदली दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा