इन्सुलीत सरपंच पदाच्या निवडणुकीच्या काही तास अगोदर भाजपाचे वेंगुर्लेकर शिवसेनेत..
तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांची राजकीय खेळी यशस्वी…
बांदा
इन्सुली मध्ये भाजपला मोठा धक्का बसला असून, शिवसेना तालुका प्रमुख रूपेश राऊळ यांनी सावंतवाडी नगराध्यक्ष तथा भाजप प्रवक्ते संजू परब यांना शह दिला आहे. इन्सुली मध्ये भाजप पुरस्कृत पॅनल चे विजेते तात्या वेगुर्लेकर यांनी आज सत्ता स्थापनेच्या वेळी अनपेक्षित असा धक्का देत हातात शिवबंधन बांधले आहे. त्यामुळे भाजपच्या सत्ता स्थापनेचा स्वप्नाला सुरुंग लागला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकी मध्ये या ग्रामपंचायतीची जबाबदारी भाजपकडून सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांच्या कडे होती. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ५ उमेदवार निवडून आणून सेनेशी बरोबरी साधली होती. तर एक अपक्ष उमेदवार निवडून आला होता. परंतु शिवसेना तालुका प्रमुख रूपेश राऊळ यांनी यशस्वी खेळी केली आहे. बबन राणे, सुशांत पांगम यांच्या प्रयत्नांना यश आले असून, तात्या वेंगुर्लेकर यांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल केला आहे.