You are currently viewing सह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने शिवस्मारक नेमळे येथे दीपोत्सव साजरा

सह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने शिवस्मारक नेमळे येथे दीपोत्सव साजरा

सह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने शिवस्मारक नेमळे येथे दीपोत्सव साजरा.*

*१०० पणत्या लावत पाहिला दिवा महाराजांना समर्पित.*

सावंतवाडी

सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानची परंपरा कायम राखत सिंधुदुर्ग विभागत सावंतवाडी तालुक्यातील दुर्गसेवकांनी दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी शिवस्मारक नेमळे येथे १०० पणत्या लावून दीपोत्सव साजरा करत पाहिला दिवा आपल्या राजांना समर्पित केला.

यावेळी प्रेरणा मंत्र, घोषणा, ध्येय मंत्र शिवभक्ती गीत म्हणत दुर्गसेवक आणि ग्रामस्थ यांनी दीपोत्सवाचा जागर केला.

यावेळी एकनाथ गुरव, दिनेश सावंत, सुनील राऊळ, सुधीर राऊळ, शुभम नाईक, आनंद राऊळ, सिध्देश धुरी, सावळाराम देवळी, किसन नेमळेकर आदी दुर्गसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा