किशोर/ किशोरी जिल्हा निवड चाचणी कबड्डी स्पर्धा सावंतवाडीत येथे….
कणकवली
सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या वतीने घेण्यात येणारी किशोर/ किशोरी जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा शनिवार दिनांक १ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेली आहे .
निवड चाचणी मध्ये सहभागी होणारे संघ हे आपल्या तालुका असोसिएशनच्या माध्यमातून सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन ला संलग्न मंडळे, क्लब असणे आवश्यक आहे. वैयक्तिक खेळाडू किंवा शालेय खेळाडू हे ही स्थानिक मंडळाच्या माध्यमातून संलग्न असणे आवश्यक आहे. अनधिकृत व मान्यते शिवाय आयोजित होणाऱ्या स्पर्धांमध्ये सहभागी होणारे खेळाडू व संघ यांचा विचार निवड चाचणीकरिता केला जाणार नाही तसेच जिल्हा व राज्य संघटनेला संलग्न असणारे खेळाडू व संघ जर अशा अनधिकृत व मान्यता नसलेल्या स्पर्धांमध्ये सहभागी झालेले असतील त्यांना राज्य संघटनेच्या नियमाप्रमाणे त्यांची जिल्हा व राज्य संघटनेची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे . ज्या खेळाडूंना फक्त निवड चाचणी स्पर्धेपूर्तीच जिल्हा संघटनेची नोंदणी घ्यायची आहे व त्यानंतर अनधिकृत स्पर्धा खेळावयाच्या असतील अशा खेळाडूंनी व संघानी कृपया सदर स्पर्धेत सहभागी होऊ नये .१६ वर्षाखालील किशोर /किशोरी गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणीत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची जन्मतारीख १/१२/२००९ व त्यानंतरची तर वजन मुलगे ६० किलो व मुली ५५ किलो आवश्यक आहे.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी वयाच्या दाखल्याबाबत पुरावा म्हणून १) दहावी व बारावीची परीक्षा दिलेल्या खेळाडूंनी परीक्षा हॉल तिकिटाची रंगीत छायांकित प्रत द्यावी. २) यावर्षी दहावी व बारावी शिकत असलेल्या विद्यार्थ्याने परीक्षा अर्ज भरल्यानंतर प्री लिस्ट ची प्रत मुख्याध्यापकाच्या स्वाक्षरीनिशी द्यावी. ३) माध्यमिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी खेळाडूंसाठी शाळेचा यु-डायस नंबर व स्टुडंट आयडी असलेल्या बोनाफाईड व निर्गम उताऱ्यावर खेळाडूच्या फोटोवर मुख्याध्यापकांनी अर्ध साक्षांकित केलेले असावे.४) इयत्ता पहिली प्रवेश घेतल्याचा निर्गम उतारा ५) आर.टी.ई.२००९ प्रमाणे प्रवेश घेतला असल्यास प्रथम प्रवेश घेतलेल्या शाळेचा यु-डायस व स्टुडंट आयडी असलेला निर्गम उतारा किंवा टीसी ची छायांकित प्रत, ६)संबंधित खेळाडूचे वय,१ किंवा ५ वर्षापर्यंत असताना संबंधित शासकीय विभागाने वितरित केलेला जन्मदाखला. ७)संबंधित खेळाडूंच्या वयाची ५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर संबंधित शासकीय विभागाचा जन्मदाखला असेल तर खेळाडूच्या पहिल्या इयत्तेतील प्रवेश घेतलेल्या जनरल रजिस्टर ची सत्यप्रत अनिवार्य राहील.यावरील पैकी एका जन्मपुराव्या सोबत खालील एक कागदपत्र असणे अनिवार्य आहे. १)आधार कार्ड ची रंगीत छायांकित प्रत व मूळ प्रत.(आधार कार्ड अद्यावत केलेले असावे यामध्ये जन्मतारखेची तारीख/ महिना/ साल स्पष्ट उल्लेख असावा).
आपली संघनिश्चिती प्रवेश अर्जासहित दिनांक ३१ ऑक्टोबर पर्यंत संघटनपर्यंत पोहचणे आवश्यक आहे
निवडलेले दोन्हीही संघ ५ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत पुणे येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेकरिता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत .
संघ निश्चिती करीता स्पर्धा संयोजक कु . आलिस्का आल्मेडा यांच्याशी संपर्क साधावा. संपर्क -7447518788
