*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*हा छंद जीवाला लावी पिसे*
हा छंद जीवाला लावी पिसे, क्षण एक परी ते
स्वस्थ न बसे..
छंद करती समृद्ध मनाची ती मशागत
छंद नसेल जीवनी होई पुरती फसगत..
वेळ जाता तो जाईना काय करावे सुचेना
मन भुताचे ते घर मुळी त्याला करमेना
लावी भिंतीला तुमड्या पेटवी ते कंड्याकाड्या
घरोघर पुजतात भटकंती घरे वाड्या..
याच्याघरी त्याच्या घरी फिरे पंढरीची वारी
लोकं कंटाळती मग याची टाळती सवारी
काही वाचावे लिहावे काही छंद जोपासावे
करून तो व्यायामही तब्येतीला सांभाळावे..
दूरदर्शन पहावे, किती छान कार्यक्रम
गाणी ऐकावी चविने जाते भरून हो मन
दिनक्रम ठरलेला रोजचाच असावा तो
मन गुंतून राहते दिवस छान मग जातो…
वेळेवरती उठावे, वेळेवरती झोपावे
मन गुंतवून घ्यावे तेच करावे स्वभावे
छंदाविना हो जीवन कल्पनाच करवेना
कसा राहे हो माणूस छंदाशिवाय रिकामा?
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
