*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*चहा…माझा स्वैराचार..!!*
सामान्याचा असामान्य सोबती
प्रेरणा…देणारा सन्मान
सौजन्याची माझ्या ऐशीतैशी
चहाचं..कडक मिठी शान
कट्ट्यावरचे माझे सगेसोयरे
बाष्कळ टिकेचा सुळसुळाट
चहाचं..सुखाचा पासवर्ड
धक्का लावालं तर..तळतळाट
कपाकपांत सूडकथेची आवर्तने
भरलेली कट्ट्यावर..अनुभवली
स्वैराचार चहाच्या स्वातंत्र्याचा
चहाची… पातळी ढासळली
लिटमसटेस्ट ..चहाचं ठरवतो
कडवट शिमग्याचा..कळस गाठतो
घोटाघोटात.. पाळेमुळे खणून
मनोमिलनाची आस..चहाचं पाजतो
अनिश्चिततेचं मळभं..दूर करत
चहाचं..नैतिकतेचं अधःपतन टाळतो
उकळलेलं कुपोषित व्यक्तीमत्वचं
फुंकुन फुंकुन.. पिऊन टाकतो
बाबा ठाकूर

