महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग च्या वतीने दि. १० फेब्रुवारी २०२१ रोजी आंतरजिल्हा बदली ५ व्या टप्यात सिंधुदुर्गचा समावेश, प्रलंबीत कार्यमुक्ती करणे व विविध प्रश्नांसाठी मा.आमदार कपिल पाटील, मा.शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड, मा. पालकमंत्री उदय सामंत यांची मंत्रालयीन भेट घेण्यात आली.
मा.ना.उदय सामंत यांची भेट घेऊन सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती विचारात घेता शैक्षणिक धोरणातील निकष बदण्या संदर्भात मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, कोकणातील आमदार यांची बैठक घेऊन स्वतंत्र शैक्षणिक धोरण राबंवणार व १००% शिक्षक पदे भरण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
त्यानंतर मा.ना.वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन दि.19 फेब्रुवारी 2019 चे 0 ते 10 पटावर एकच शिक्षक कार्यरत ठेवावा हे शालेय शिक्षण विभागाचे पत्र रद्द करावे व संच मान्यता होत नसल्याने अतिरीक्त शिक्षकाचे समायोजन होत नाही म्हणून संचमान्यता साठी tab उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली
यावर त्वरित निर्णय घेतला जाईल असे अश्वासन दिले आहॆ.
सन २०१८-१९ व २०१९-२० ची रखडलेली शिक्षक संचमान्यता आँफलाईन पद्धतीनॆ पूर्ण करून व मुख्याध्यापकांना कार्यरत पदावर गृहीत धरून आंतरजिल्हा बदली रिक्त पदांची टक्केवारी कळविण्याबाबताचे आवश्यक मार्गदर्शन पत्र ग्रामविकास सचिवांचे लवकरात लवकर प्राप्त करून देण्याचे व पाचव्या टप्प्यात सिंधुदुर्गचा समावेश करूनच देणार असे ठोस आश्वासन माननीय आमदार कपिल पाटील यांनी दिले. याबाबतचे व त्यासंबंधी तातडीने कार्य करण्याचे पत्र मा. ग्राम विकास मंत्री व माननीय ग्राम विकास सचिव यांना दिले
हे पत्र प्राप्त होताच रखडलेल्या शिक्षकांच्या कार्यमुक्तीचा मार्ग सुकर होईल.
अप्रशिक्षित शिक्षकांच्या वरिष्ठ वॆतन श्रॆणीचा प्रश्न मा. ग्राम विकास मंत्री व मा. शिक्षणमंत्री यांच्या समवेत हॊणा-या राज्य संघटनेच्या बैठकीत मांडून त्यासाठी आवश्यक असणारा निर्णय करून घॆण्याचॆ मा. आमदार कपिल पाटिल यांनी शिष्टमंडळास दिले.
तसेच शिक्षकांच्या समस्या जाणून घेवून त्या सॊडविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करण्याचॆ आश्वासन शिष्टमंडळास दिलॆ
यावॆळी राज्याध्यक्ष श्री नवनाथ गॆंड, राज्यउपाध्यक्ष श्री दयानंद नाईक, राज्यसंघटक श्री किसन दुखंडॆ,जिल्हाध्यक्ष संतॊष पाताडॆ,दॊडामार्ग सचिव श्री सखाराम झॊरॆ, वॆंगुर्ला अध्यक्ष श्री वसंत गर्कळ, कार्याध्यक्ष वॆंगुर्ला श्री ईश्वर थडकॆ, कणकवली महिला प्रतिनिधी श्रीमती रुपाली जाधव उपस्थित हॊत्या.