मालवण :
शिवसेना मालवण उपशहर प्रमुखपदी संदेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी चव्हाण यांना नियुक्तीपत्र देत ही नियुक्ती जाहीर केली.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेने आणि शिवसेनेचे प्रमुख नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्तीचा कालावधी एक वर्षाचा असेल.
नियुक्तीपत्रात नमूद केल्याप्रमाणे, बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण यांचा सक्रियपणे प्रचार-प्रसार करत, शिवसेना पक्षाच्या वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य करण्याचा संदेश देण्यात आला आहे.
या प्रसंगी माजी आमदार राजन तेली, जिल्हा समन्वयक महेश कांदळगावकर, मच्छीमार आघाडी जिल्हाप्रमुख राजा गावंकर, महिला जिल्हाप्रमुख सौ. दीपलक्ष्मी पडते, संजय पडते, विधानसभा प्रमुख बबन शिंदे, शहरप्रमुख दीपक पाटकर, तालुकाप्रमुख विनायक बाईत, उपजिल्हाप्रमुख विश्वास गावंकर, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, युवती सेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
