स्वावलंबी भारत अभियानाच्या सावंतवाडी तालुका समन्वयकपदी बाबा काणेकर….
बांदा
स्वावलंबी भारत अभियानाच्या सावंतवाडी तालुका समन्वयकपदी भाजपचे बांदा शहर अध्यक्ष नरसिंह उर्फ बाबा काणेकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत असून स्थानिक उद्योग, उद्योजकता आणि रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने या निवडीकडे एक सकारात्मक पाऊल म्हणून पाहिले जात आहे.
स्वावलंबी भारत अभियानाचा उद्देश देशाला आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनविणे, स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देणे, ग्रामीण भागात पायाभूत सुविधा उभारणे आणि युवकांना उद्योजकतेकडे वळविणे हा आहे. या मोहिमेअंतर्गत स्वदेशी उत्पादनांचा वापर, लघुउद्योगांना चालना, तसेच मेक इन इंडिया संकल्पनेला ग्रामीण स्तरावर बळकटी देण्याचे प्रयत्न केले जात आहेत. नरसिंह काणेकर यांनी यापूर्वी विविध सामाजिक व विकासात्मक उपक्रमांमधून कार्य केले असून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यास ते नेहमी तत्पर राहिले आहेत. समन्वयक म्हणून ते सावंतवाडी तालुक्यातील ग्रामस्तरावर अभियानाची अंमलबजावणी, उद्योजक प्रशिक्षण शिबिरे, आणि महिला-बचत गटांमार्फत उत्पादकतेला चालना देणारे कार्यक्रम राबविणार आहेत.
त्यांच्या निवडीबद्दल विविध सामाजिक संस्था, व्यावसायिक संघटना आणि स्थानिक नागरिकांनी अभिनंदन व्यक्त केले आहे. स्वावलंबी भारत अभियानाच्या माध्यमातून सावंतवाडी तालुक्यात विकास आणि स्वावलंबनाची नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
