You are currently viewing वादळाचा इशारा

वादळाचा इशारा

वादळाचा इशारा; मच्छिमारांनी नौका देवगड बंदरात आणल्या

देवगड :

अरबी समुद्रात वादळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचा इशारा हवामान खात्याने दिल्यानंतर मच्छिमारांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपापल्या नौका देवगड बंदरात आणल्या आहेत. या नौकांमध्ये स्थानिकांसह गुजरातमधील अनेक नौकांचा समावेश आहे.

हवामान विभागाने २८ ऑक्टोबरपर्यंत समुद्रात ताशी ४५ ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे मच्छिमारांना या काळात समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. परिणामी, समुद्रात गेलेल्या शेकडो नौका परत येऊन देवगड बंदरात थांबल्या आहेत.

गुजरात व कोकणातील नौका बंदरात दाखल झाल्याने परिसरात मोठी गजबज दिसून येत आहे. दरम्यान, अलीकडे मच्छिमारांना बांगडा, तोवर, पेडवे आणि गेजर या प्रकारच्या मासळ्यांचा चांगला भर मिळत होता; मात्र हवामानातील अस्थिरतेमुळे मच्छिमारी थांबल्याने बाजारात मासळीचे दर झपाट्याने वाढले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा