You are currently viewing स्मृतीचे…मुखवटे…!!

स्मृतीचे…मुखवटे…!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*स्मृतीचे…मुखवटे…!!*

 

आपली स्वप्नं..आपलीचं

कां..दुस-यांची स्वप्ने जगतो

 

गलका बाहेर एवढा

आतल्या आत ..पेटतो..

 

वेदना विद्रोह नकार

काळजाला ..मान्य नाही

 

जाती धर्माचा वर्चस्ववाद

देशाला ..परवडतं नाही..

 

स्मृतीचे मुखवटे घालून

आभासीभ्रम धावून आले

 

इतिहास साक्षीदार आहे

मायाजालात काळीज गलबलले

 

भावनेने शिगोशिगी.. भरलेले

दगडी जात्यावर ..भरडले

 

नफ्यासाठी अडचणीची वक्तव्ये

तिखटबोल ..गोंदले गेले..

 

स्मृतीचे मुखवटे इतिहासाने

आजवर उतरवले.. नाही

 

समाजाचे श्वास अडकले

ईडापीडा टळली ..नाही..

 

देशापुढे…काहीही.. नाही

एकतेला..पर्याय ..नाही..

 

स्मृतीचे..मुखवटे उतरवा

सशक्त भारत ..दुसरा पर्याय नाही

 

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा