*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
मन पांखरू पांखरू…
मन पांखरू पांखरू…
कसं उडे भुरू भुरू
आवरता आवरेना
सांगा कशी हो आवरू?..
पंख लावून उडते
जाते माहेरच्या वेशी
हळूच विचारते…
सांग आहे आई कशी…
माहेरच्या दिवाळीची
काढे सतत आठव
आई दिवाळीला मला
बाई, मूळ तू पाठव…
तुझ्या हातच्या सांजोऱ्या
मन भरून खाईन
आणि दोनचार बघ
माझ्या घरी ही आणिन…
गुळ तेलाचे ग लाडू
तुझी खसखस त्यात
खोबऱ्याचा किस लागे
किती लागे ग अप्रूक…
तू नाही अशी पहा
जाणीवच होत नाही
हृदयात घर तुझे
आहे बांधलेले आई…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६९५६४२)
