*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*दिवाळी आनंदात दिसावी*
रोज लिहीन मी एक कविता
त्यांच्या चेहऱ्यावरची दिवाळी
आनंदात दिसावी म्हणून…
झेंडूच्या फुलांसारखे शब्दफुले ओवून
माळीन मी एक एक ओळ
सजवून एक एक कडव्यांची माळा
पुर्णरूपी कविता लिहीन
लिहीन मी एक हास्य कविता
त्यांच्या चेहऱ्यावर फराळाची
हसरी दिवाळी बघण्यासाठी
गरीबी लाचारीच्या दुःखातून
दिवाळीत गरीबांचा आनंद फुलवण्यासाठी….
लिहीन मी एक ज्वलंत कविता
ओल्या, कोरड्या दुष्काळात
होरपळून निघालेल्या
शेतकऱ्याच्या आत्महत्येपूर्वी
सरकार दरबारी जाग यावी
म्हणून
मांडेल आक्रोश कवितेतून
शेतकऱ्याला
न्याय मिळवण्यासाठी
त्याचीही दिवाळी साजरी
व्हावी म्हणून…
लिहीन मी एक कविता
त्यांच्यासाठी ज्यांच्यावर
अस्मानी सुल्तानी संकटांच्या
दुःखाचा डोंगर कोसळून
दिवाळं निघाल्याने दिवाळी सणाला मुकलेल्यांसाठी…
त्यांचीही दिवाळी आनंदात
दिसावी म्हणून
लिहीन मी एक कविता…
कवी:-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे*
७५८८३१८५४३.
८२०८६६७४७७.

