You are currently viewing आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक

आमदार निलेश राणे आणि जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची उपस्थिती

 

मालवण :

आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मालवण तालुका शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक आमदार निलेश राणे आणि शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शुक्रवारी, २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता मालवण शहर दैवज्ञ भवन सभागृहात होणार आहे.

या बैठकीस शिवसेना शाखाप्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख तसेच सरपंच, उपसरपंच, शहर व तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आजी-माजी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीचे आयोजन शिवसेना मालवण तालुका प्रमुख राजा गावडे, तालुका प्रमुख विनायक बाईत आणि शहर प्रमुख दीपक पाटकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा