*जागतिक साकव्य तथा मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, महाकवी कालिदास प्रतिष्ठानच्या सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ.मानसी पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*दीपोत्सव*
सण आला हो दीपोत्सव हा घरात साऱ्या
चला शुभेच्छा देऊ त्याच्या जगात साऱ्या
ज्योतीस ज्योत लावुन बघता वळून मागे
ते जपलेले बाल्य आठवे मनात साऱ्या
वसुबारसेस गोठ्यामध्ये गोधन पूजा
माया ममता जिव्हाळा दाटे उरात साऱ्या
उटणे लाउन स्नान करू या पहाट वेळी
माळ दिव्याची उजळून टाकू नभात साऱ्या
लक्ष्मीपूजन झेंडू तोरण दारावरती
थाट असा हा दिप्ती जाई दिशात सा-या
करू पाडवा खास साजरा औक्षण करुनी
प्रितबंधाचा हा क्षण जपुया मनात साऱ्या
भाऊ येतो यमद्वितीयेस भेटीसाठी
भरून असते माया त्याची उरात सा-या
दीपावलीत अवघा जीवन मोद लुटावा
प्रदूषणाला टाळू आपण सुखात साऱ्या
©️®️डॉ सौ.मानसी पाटील
