You are currently viewing लाऊ एक दिवा

लाऊ एक दिवा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*लाऊ एक दिवा*

 

लाऊ एक दिवा

गरिबाच्या घरी

घरात खातो

भाजी भाकरी

 

लाऊ एक दिवा

पूरग्रस्ता घरी

पावसाने नेले

वाहुन सारे उरी

 

लाऊ एक दिवा

विधवेच्या घरी

नाही उजेड दिसत

अंधारातच बरी

 

लाऊ एक दिवा

शेतकऱ्या घरी

मालाला नाही भाव

सदा कर्ज बाजारी

 

लाऊ एक दिवा

वृध्दाश्रमा दारी

मजा करतो लेक ज्याच्या

डोळ्यात नाही पाणी

 

लाऊ एक दिवा

सैनिकाच्या दारी

सीमेवरती पहारा देतो

पत्नी, मुले घरी

 

फटाक्यांची आतिषबाजी

झाली बेचिराख

पाहून झाले सुन्न मन

नुकसान बेहिसाब

 

*शीला पाटील. चांदवड.*

प्रतिक्रिया व्यक्त करा