You are currently viewing कोनाळच्या नरकासुराला पहिला क्रमांक

कोनाळच्या नरकासुराला पहिला क्रमांक

कोनाळच्या नरकासुराला पहिला क्रमांक;

बाबा टोपले मित्रमंडळातर्फे दोडामार्गमध्ये भव्य स्पर्धा संपन्न

दोडामार्ग
बाबा टोपले मित्रमंडळाच्या वतीने भेडशी (खालचाबाजार) येथील बाबा टोपले यांच्या निवासस्थानी दोडामार्ग तालुका मर्यादित नरकासुर स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ ग्रामस्थ कालिदासभाई भणगे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

स्पर्धेस विविध भागांतील अनेक संघांनी सहभाग घेतला होता. कोनाळ येथील युवकांनी उत्कृष्ट नरकासुर सादर करून प्रथम क्रमांक पटकावला व ८,००० रुपयांचे बक्षीस मिळवले. झरेबांबर काजुळवाडीने दुसरा क्रमांक (५,००० रुपये), तर आंबेली दोडामार्ग व थोरलेभरड या संयुक्त संघाला तिसरा क्रमांक (३,००० रुपये) प्राप्त झाला. भेडशी मित्रमंडळाला उत्तेजनार्थ २,००० रुपयांचे बक्षीस देण्यात आले.

या स्पर्धेचे परीक्षण नगरसेवक चंदन गावंकर, राकेश भोळे, सौ. गौरी दत्ताराम टोपले, सुजाता नंदकिशोर टोपले, सुशांती रोहित टोपले व वैष्णवी वदन टोपले यांनी केले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अभिजित म्हापसेकर आणि नागेश टोपले यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

स्पर्धेच्या निमित्ताने दोडामार्ग तालुक्यातील प्रतिष्ठित मान्यवर, स्थानिक ग्रामस्थ आणि भेडशीतील देवस्थान मानकरी अनिल मोरजकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

अॅड. धनश्री टोपले हिचा गौरव
या कार्यक्रमात भेडशी ग्रामविकास कमिटीचे अध्यक्ष तुकाराम टोपले यांची कन्या अॅडव्होकेट धनश्री टोपले हिचा गोवा येथून विधी पदवी प्राप्त केल्याबद्दल शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तिच्या यशाबद्दल परिसरातून कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

कार्यक्रमाने गावात उत्साहाचे व सांस्कृतिक वातावरण निर्माण केले असून, बाबा टोपले मित्रमंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा