सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचा जिल्हा कारागृहा कडून सन्मान.
सावंतवाडी
सावंतवाडी कारागृह तसेच जिल्हा सिंधुदुर्ग कारागृहामध्ये सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून बंदयासाठी आरोग्य शिबिर, मार्गदर्शन शिबिर, व्यसनमुक्ती शिबिर तसेच वस्तू व जीवनावश्यक वस्तूंची सेवा पुरवली जाते याचीच दखल घेऊन सावंतवाडी जिल्हा कारागृह वर्ग -2 जिल्हा सिंधुदुर्ग सतीश कांबळे यांच्याकडून जिल्हा कारागृहामध्ये निमंत्रित करून सन्मानपत्र देण्यात आले याप्रसंगी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, रूपा मुद्राळे, लक्ष्मण कदम व सामाजिक कार्यकर्ते शुवम सावंत उपस्थित होते.
