*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम लेख*
*मनातले काही*
*अनुभव सांगणाऱ्या म्हणी*
————— —————-
वाचक मित्र हो नमस्कार,
आपले जीवन अर्थपूर्ण करणाऱ्या अनेक गोष्टी आपण आपल्या दैनंदिन जगण्यात अनुभवत असतो.
वाक्प्रचार आणि म्हणी ” या दोन गोष्टींना लहानपणापासून
ऐकत मोठे झालेलो आहोत ” हे जाणवत ही नाही.
आपल्या सभोवताली असलेली अनुभवी ,मोठी माणसे मोजक्या आणि नेमक्या शब्दात अनुभवांचे बोल आपल्याला सांगतात ते शब्द वाक्प्रचारआणि म्हणींचा
वापर करूनच बोलले जातात.
शेकडो वर्षांपासून लोकजीवनात, समाजमानसात,
लोकमानसात “सुविचार, सुभाषिते, वाक-प्रचार , म्हणीं”
यांना मोठे मोलाचे स्थान आहे.
यात आपल्याला मोलाचे सल्ले मिळतात, मन विचार करण्यास प्रवृत्त होते. आपल्या क्रियाशीलतेला चालना मिळते.
“काय करावे- काय करू नये ?, हे या सांगितलेले असते.
ऐकलं त्याचे भले- ना ऐकेल त्याचे ही भले ! असा व्यापक भाव असतो.
दोन ओळींच्या छोट्या म्हणींमध्ये , सुविचार ,सुभाषिते ” यात फार मोठा आशय, भाव दडलेला असतो, ज्यांना तो समजतो, ते समजून घेतात.
समझनेवाले को इशारा काफी है ! असे असते हे .
अशीच एक म्हण आहे ” अपयश ही यशाची पहिली पायरी आहे” , यातून प्रयत्न करणे थांबवू नये , यातच पुढचे यश
सामावलेले आहे” हे वेळीच ओळखणाऱ्यास यश मिळते”.
माणूस चुका करतो ” हे गृहीतच धरले आहे, तरी त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा करू नये ” हे ही अपेक्षित असते.
म्हणूनच चुकत चुकत का होईना हातची गोष्ट न सोडता स्वतःत सुधारणा करून योग्य परिणाम साधता आला तरच
माणूस शहाणा होतो.
अनुभवी ,जाणती माणसे त्यांचे बोल न कंटाळता सांगतील ही, पण समोरच्याच्या मनावर त्याचा काहीच परिणाम न होणे म्हणजे ” पालथ्या घड्यावर पाणी ” असा प्रकार असतो.
माणसें नाना प्रकारची असतात, “एकाचा एकाला मेळ नसतो”, तरी “अशा अनेकांची एकत्र मोट बांधणारा “एखादा हुशार असतोच ना !
स्वभाव, वृत्ती, वागण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत,
अशा अनेक गोष्टींवर आधारित म्हणी आपण रोजच
सहजतेने वापरत असतो ” हे आपल्याला जाणवत देखील नसते.
‘गाढवाला गुळाची काय चव ?
“असून अडचण नसून खोळंबा ”
“खायला काळ भुईला भार ”
” नमनाला घडाभर तेल ”
“मला पहा, फुलं वहा ”
“आयत्या बिळावर नागोबा ”
“ऋण काढून सण साजरा करू नये ”
“अंथरूण पाहून पाय पसरावे ”
“दुरून डोंगर साजरे ”
“गोगलगाय नि पोटात पाय”
“काखेत कळसा नि गावाला वळसा ”
“उथळ पाण्याला खळखळाट फार ”
“आयजीच्या जीवावर बायजी उदार ”
वरील परिचित वाक-प्रचार वाचा, नव्याने अर्थ कळतील.
———– ————- – – ————-
लेखन-स्नेही
अरुण वि.देशपांडे पुणे
९८५०१७७३४२
—————- – ——————— ———————–
