तळकट येथे उद्या रक्तदान शिबिराचे आयोजन…
बांदा
अष्टविनायक कला क्रीडा मंडळ तळकट-कट्टा आणि तळकट ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र तळकट व सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या प्राथमिक आरोग्य केंद्र तळकट येथे सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व रक्तदात्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन रुग्णसेवेसाठी ऐन दिवाळीत आपल्या प्रमाणेच कुणाचीतरी दिवाळी आनंदात साजरी व्हावी म्हणून रक्तदानाचा दीप प्रकाशमान करूया. इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य करावे असे आवाहन अष्टविनायक कला क्रीडा मंडळ तळकट, ग्रामपंचायत तळकट सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान दोडामार्ग यांनी आवाहन केले आहे.

