You are currently viewing दिवाळीनिमित्त दिव्यांग बांधवांना भेटवस्तू वाटप

दिवाळीनिमित्त दिव्यांग बांधवांना भेटवस्तू वाटप

दिवाळीनिमित्त दिव्यांग बांधवांना भेटवस्तू वाटप

सिंधुदुर्ग

भाजप दिव्यांग विकास आघाडी सिंधुदुर्ग यांच्या वतीने शनिवार दिनांक 18 ऑक्टोबर 2025 रोजी कणकवली शहरातील कनकनगर येथील धरणे मॅडम यांच्या घरी दिवाळी निमित्त भेटवस्तू वाटप हा कार्यक्रम पार पडला.धरणे मॅडम यांनी कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करुन दिली. त्यांचे स्वागत करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. देसाई सर सामाजिक कार्यकर्ते लाभले. सहसंयोजक प्रकाश वाघ, सुनील तांबे,दीपक कापसे, प्रकाश सावंत,राजेंद्र मेस्त्री, प्रशांत कदम, आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे कर्मचारी विशाखा कासले, हर्षद खरात हेही उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रकाश वाघ यांनी केले. व भाजप दिव्यांग विकास आघाडीचे संयोजक श्री.अनिल शिंगाडे यांनी उपस्थित दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले व मान्यवरांच्या उपस्थितीतमध्ये मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.त्यानंतर पांढरी काठी दिनाचे औचित्य साधून शशिकांत दबडे, व संदीप माळोदे यांना पांढरी काठी देण्यात आले.या कार्यक्रमास कणकवली तालुक्यातून30 हून जास्त दिव्यांग उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना भेटवस्तू वाटप करण्यात आले. त्यानंतर विशाखा कासले मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपला असे जाहीर केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा