माडखोल भाजपा आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!
सावंतवाडी
भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त माडखोल भाजपाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात महिलांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन जिल्हा बँक संचालक तथा माजी सभापती रवींद्र मडगावकर यांच्याहस्ते करण्यात आले.
धवडकी प्राथमिक शाळेत घेण्यात आलेल्या या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रगती तावडे, देवस्थान मानकरी दत्ताराम राऊळ, माजी उपसरपंच तथा सोसायटी चेअरमन जी जी राऊळ, भाजपा युवा कार्यकर्ते अमित राऊळ, संदेश बिडये, माजी सरपंच संजय राऊळ, संजय शिरसाट, माजी उपसरपंच शिवाजी परब, ग्रामपंचायत सदस्य भाऊ कोळमेकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष तुळशिदास मुरकर, पोलीस पाटील उदय राऊत, शैलेश माडखोलकर, पारस धुरी, वेर्ले भाजपा बुध अध्यक्ष प्रसाद गावडे, सत्यविजय तावडे, जयू मडगावकर, स्वप्निल राऊळ आदी उपस्थित होते.
यावेळी रवींद्र मडगावकर म्हणाले, रवींद्र चव्हाण यांचे सह्याद्री पट्ट्यावर विशेष लक्ष असून आपल्या पालकमंत्री पदाच्या काळात त्यांनी या भागाच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला. आज ते राज्याचे नेतृत्व करीत आहेत हे सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. त्यामुळे त्यांचा वाढदिवस सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. या रक्तदान शिबिराचे आयोजन भाजपा कार्यकर्ते अमित राऊळ यानी केले होते. या शिबिरात सावंतवाडी रक्तपेढीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ रिद्धी मारवीया, अनिल खाडे, प्राजक्ता रेडकर, मानसी बागेवाडी, रश्मी राऊळ, अस्लम शेख यांनी रक्त संकलन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विनेश तावडे यांनी केले.
या रक्तदान शिबिरात पांडुरंग कारीवडेकर, संदेश सावंत, सखाराम खरात, सागर परब, संदेश बीडये, नितीन सावंत, सुभाष देसाई, विनायक मेस्त्री, तेजस सोमण, सुनिल चव्हाण, जितेंद्र भालेकर, तुषार जंगले, जॅकी डिमेलो, स्वप्नील राऊळ, सखाराम तायशेटे, संभाजी सावंत, जयू मडगावकर, शैलेश माडखोलकर, दत्ताराम ओवळीयेकर, कृष्णा राऊळ, पारस धुरी, गौरेश गावडे, सुमित राऊळ, प्रितेश कालवणकर, रामचंद्र भोसले, भूषण राऊळ, अरविंद परब, विजय सावंत, राहुल वासकर, किरण गुडेकर, संतोष गावडे, संतोष करंगुट्टे, अब्राहम शेख, श्रीनाथ खेडेकर, महादेव पोकळे, धनश्री सौंदेकर, दीपक देसाई, राकेश पाटकर, सगू सावंत, विनेश तावडे आदींनी रक्तदान केले.
