“दिवाळीच्या पहिल्या दिवशी बावशीतील कुलदैवत व कुर्लीतील देवस्थानांना भक्तांचे दर्शन – आत्मिक समाधानाचा अनुभव”
फोंडाघाट
आज दिवाळीच्या निमित्ताने, सालाबाद प्रमाणे भक्तांनी बावशी येथील कुलदैवत, इच्छा पूर्ती गणेश, पाच झाड जागृत देवस्थान तसेच कुर्ली वसाहतीतील शंकर मंदिराला भेट देत परिक्रमा पूर्ण केली. अभ्यंग स्नानानंतर केलेल्या या धार्मिक यात्रेने भक्तांच्या मनाला विशेष समाधान दिले.
विशेषतः, दिवाळीच्या पहिल्या दिवशी कुलदैवताचे दर्शन घेण्याची परंपरा यंदाही पाळली गेली. यासोबतच कुर्ली वसाहतीतील स्व. दाजींचा मनमोहक पुतळा देखील भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरला. या अध्यात्मिक वातावरणाने दिवाळीची सकाळ आणखी सुंदर केली.
🪔🙏

