You are currently viewing वर्दे येथे तरुणाची गळफास घेत आत्महत्या

वर्दे येथे तरुणाची गळफास घेत आत्महत्या

वर्दे येथे तरुणाची गळफास घेत आत्महत्या

कुडाळ :

तालुक्यातील वर्दे-वरची कुंभारवाडी येथे एका तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. प्रकाश दिलीप वर्देकर (३२) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश दिलीप वर्देकर हे वर्दे-वरची कुंभारवाडी येथे राहत होते. शनिवारी दिनांक १८ ऑक्टोबर २०२५ सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये गळफास लावून आत्महत्या केली.

या घटनेची माहिती त्यांचे वडील दिलीप वर्देकर यांनी तात्काळ कुडाळ पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा केला. प्रकाश वर्देकर हे अविवाहित होते. त्यांनी कोणत्या कारणामुळे हे टोकाचे पाऊल उचलले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कुडाळ पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून, अधिक तपास आवळेगाव पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार तिवरेकर हे करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा