“धाडसी कृतीने १२ फुटी अजगर पकडून वनविभागाच्या ताब्यात”
सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांकडून जीव वाचवण्याचे कौतुकास्पद काम
सावंतवाडी
रात्री तीनच्या सुमारास कांडरकरवाडी येथे प्रमोद गावडे यांच्या घराशेजारी सुमारे १२ फुटी अजगर आढळून आला. या धक्कादायक प्रसंगात सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे पदाधिकारी शेखर सुभेदार व त्यांच्या मित्रमंडळींनी प्रसंगावधान राखून अजगर सुरक्षितपणे पकडला आणि त्याला वन विभागाच्या ताब्यात देऊन नैसर्गिक संतुलन आणि प्राणीमात्रांप्रती संवेदना जपली.
शेखर सुभेदार हे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या विविध उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर असतात. यावेळी देखील त्यांनी धाडसी आणि जबाबदार नागरिकत्व दाखवत एक मोठा अनर्थ टाळला.
स्थानिक नागरिकांनीही या कार्याचे कौतुक करत शेखर सुभेदार आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले आहे. वन विभागानेही वेळेवर दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले.
