You are currently viewing चैतन्य दिवाळी अंकाचे प्रकाशन संपन्न 

चैतन्य दिवाळी अंकाचे प्रकाशन संपन्न 

दिनांक १४ ऑक्टोबर :

प्राधिकरण जेष्ठ नागरिक संघाचा २३ वा चैतन्य दिवाळी विशेषांक २०२५ चा प्रकाशन सोहळा मंगळवार दिनांक १४ ऑक्टोबर रोजी तुकाराम उद्यान सभागृहात साजरा झाला.

प्रमुख पाहुण्या सौ रश्मी कांकरीया, संचालिका ब्राह्मी सेवा धाम ट्रस्ट तसेच दिवाळी अंकाचे प्रकाशन अध्यक्ष श्री सुजित शिवाजी कदम कवी, लेखक, दिग्दर्शक, लघुपट निर्माते, गीतकार यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. दीप प्रज्वलनानंतर दिपाली जोगळेकर यांनी स्वागत गीत म्हटले. सुजित कदम यांचा परिचय सौ आशा नष्टे यांनी करून दिला. अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यानचा सत्कार श्री आनंदराव मुळूक यांनी शॉल श्रीफळ देऊन केला.

श्री अशोक चोपडे यांनी संपादकीय मनोगत व्यक्त केले. यानंतर दिवाळी अंकाचे प्रकाशन झाले. श्री सुजित कदम यांनी दिवाळी अंकातील कविता लेख याविषयी मनोगत व्यक्त केले. तसेच कविता कशी लिहावी याचे मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या स्वतःच्या कविताही सादर केल्या.

प्रमुख पाहुण्या रश्मी कांकरीया यांनी आपले मनोगत व्यक्त केले. व ट्रस्ट बद्दल थोडक्यात माहिती सांगितली. सर्वात जास्त रकमेच्या जाहिराती मिळवून देणारे डॉ. दिगंबर इंगोले यांचा सत्कार करण्यात आला.तसेच अलका बेल्हेकर, जगन्नाथ वैद्य यांचाही शाब्दिक सत्कार करण्यात आला. यानंतर साडेतीन व त्याहून अधिक हजाराच्या जाहिरात देणाऱ्या सर्व जाहिरातदारांचे शॉल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

मंदिर समितीचे अध्यक्ष श्री चौसाळकर,संपादक अशोक चोपडे यांचा शॉल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

श्री दिलीप गोसावी कार्याध्यक्ष यांनी आभार मानले. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ अलका बेल्हेकर यांनी केले. कार्यक्रमाला डॉक्टर्स,नगरसेवक जाहिरादार, सर्व संघातील आजी-माजी अध्यक्ष व सदस्य बहुसंख्येने हजर होते.

मा.कुंदा कोळपकर, रामचंद्र डुंबरे यांनी सुंदर नियोजन केले होते. कार्यकारिणीतील सर्व सदस्य तसेच विलास बेल्हेकर, श्रीनिवास ठोंबरे, शुभदा मेंगळे श्री सुभाष बोरोले, काशिनाथ पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. ज्येष्ठ नागरिक तसेच तुकाराम उद्यानातील कार्यकारिणी सदस्यामुळे कार्यक्रम अप्रतिम असा झाला.

श्री जैनम कार्ड्स यांनी वेळेत अंक छापून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा