*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*
*हे प्रिये*
हे प्रिये श्वासात तुझिया
गोंदुनी घे नाव माझे
देव ही जळतील सारे
अप्सरा आहे कुणाची ।।
घाबरावे का जगाला
चोर तू ही चोर मी ही
का मनाच्या चोरण्याला
भीती आहे का कुणाची ।।
त्या तुझ्या दृष्टीत मी गं
का असा सामावलेला
तू जगा विसरुन जावे
फिकिर आहे का कुणाची ? ।।
तू अशी मिसळून जावी
मी असा मिसळून जावा
का तमा ती बाळगावी
बोचर्या वेड्या जगाची ?।।
पंचभूतांनी मिळावे
आणि व्हावे वेगळे
ही अशी ही रीत व्हावी
आपुल्या या जीवनाची।।
🍒🍒🍒🍒🍒🍒🍒🍒🍒
*©सर्वस्पर्शी*
©आयुर्वेदाचार्य
कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख.
पिंपळनेर (धुळे)४२४३०६
*९८२३२१९५५०*

