सावंतवाडी :
भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी येथे ‘लोकल टू ग्लोबल’ या उद्योग व व्यवसाय रोजगार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव आजपासून १९ ऑक्टोबरपर्यंत पार्वती देवी हायस्कूलच्या परिसरात होणार आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन आज दुपारी तीन वाजता भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन दोन दिवस चालणार असून सामाजिक बांधिलकी आणि आत्मनिर्भर कोकण या अभियानांतर्गत ‘मेक इन कोकण’ या उपक्रमाला चालना देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
