*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*दिवाळी*
जाता सण दसऱ्याचा
लगबग दिवाळीची सुरु
करुन साफ सफाई
नमन दिपकास करु
प्रथम दिनी वसुबारस
पुजा गाय वासराची
सायंकाळी करु पुजा
गोठ्यात माय लेकराची
घराची लक्ष्मीचं ती
दारात आपल्या असते
लावता हळदी कुंकवाला
अखंड सौभाग्य ती देते
दुसऱ्यादिनी धन त्रयोदशी
पुजा धन धान्यांची
सण आला आनंदाचा
दीपमाळा पणत्यांची
अभ्यंगस्नान पहाटेला
नरक चतुर्दशीच्या दिनी
वध केला महिषासुराचा
श्री कृष्ण भगवावनांनी
पुजा मांडू मांगल्याची
पाऊले पडती लक्ष्मीची
येता घरात लखलखाट
देवघरात वात समईची
चैतन्याचा आकाशकंदील
भिडे उंच गगनाला
फटाक्यांची अतिषबाजी
मजा भारी फराळाला
मामा मामी, काका काकी
पाहुणे येती घराला
मौज मस्ती आनंदाची
पुर येई आनंदाला
गोड दिन पाडव्याचा
पुजा धान्य, शस्त्रांची
व्यवहाराची किर्द खतावणी
संस्कृती हिंदु धर्माची
भावा, बहिणीचा सण
भाऊबीज आनंदाचा
याहुन नाही दुसरे सुख
आनंद साजरा नात्याचा
*शीला पाटील चांदवड.*

