सिंधुदुर्गनगरी-
सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टचा 39 वा, वर्धापन दिन माघी गणेश जयंती उत्सव निमित्त कसाल येथे सालाबाद प्रमाणे याहीवर्षी गणेश जयंती, साध्या व धार्मिक पद्धतीने विविध कार्यक्रम करण्यात येणार आहे ,कोरोणाच्या नियमांचे पालन करून हा कार्यक्रम करण्यात येणार आहेत तरी भाविकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन ,श्री सिद्धिविनायक ट्रस्ट मंडळाच्यावतीने करण्यात आले.
दरम्यान दिनांक 12 रोजी सकाळी आठ वाजता गणेश मंदिर हॉल येथे रक्तदान, शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे 7 वे वर्ष असून हे शिबिर सकाळी 8 ते 12, वाजेपर्यंत होणार आहे तरी पंचक्रोशीतील रक्तदात्यांनी तसेच युवा वर्गाने रक्तदान करावे असे मंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे. दिनांक 14 रोजी सकाळी 7, वाजता श्री गणेश पूजन, 1000, आवृत्तीचा रसाभीषेक, तसेच कुमारी पूजन, 51, हजार दुर्वांची श्रींंची पूजा, तसेच सायंकाळी 5 वा हरिपाठ वारकरी संप्रदाय पोखरण ग्रामस्थ, सायंकाळी 7 वाजता, मंदिर परिसरात दीपोत्सव ,9 वाजता किर्तन ह, भ, प, श्री, पुरुषोत्तम पोखरणकर, दिनांक 15 रोजी, सकाळी 7 वा, स्थापित देवतांची पूजा, सकाळी आठ वाजता ग्रामदैवत पालखी भेट, दुपारी 12 वा, श्री गणेश जन्म सोहळा, महाआरती, सत्यनारायण पूजा, तसेच सायंकाळी 7 वा, चित्ररथ दिंडी, रात्री 10 वा, खानोलकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळाचा, नाट्यप्रयोग होणार आहे, तरी भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.
( तसेच या वर्षी सिद्धिविनायक मंदिरातर्फे होणारा दुपारचा महाप्रसाद व सायंकाळचे सांस्कृतिक कार्यक्रम हे कोरोणाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी होणार नाही, याचीही भाविकांनी नोंद घ्यावी. असे सिद्धिविनायक ट्रस्टच्यावतीने कळविण्यात आले आहे. )