You are currently viewing जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचा कु. सोहम देशमुख जिल्ह्यात प्रथम

जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचा कु. सोहम देशमुख जिल्ह्यात प्रथम

*जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचा कु. सोहम देशमुख जिल्ह्यात प्रथम*:

सावंतवाडी

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा, जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग, ओरोस येथे गुरुवार, दिनांक १६ ऑक्टोबर २०२५ रोजी घेण्यात आली. या स्पर्धेत एकूण आठ तालुक्यातील १४ वर्ष गटातील विद्यार्थ्यांचा सहभाग होता. यामध्ये स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचा इयत्ता सातवी मधील विद्यार्थी कु. सोहम देशमुख ६ फेऱ्यांमध्ये टिकून राहिला व ५.५ गुण प्राप्त करीत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. त्याची विभाग स्तरावर निवड झाली असून तो सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्याठिकाणी उपस्थित असलेले जिल्हा क्रीडा अधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या वतीने कु. सोहम देशमुख याचा सन्मान करण्यात आला. प्रशालेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी कु. सोहम देशमुख याचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा