*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
।।गण गण गणात बोते । जय गजानन श्री गजानन ।।
––————————————–
श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प- १२० वे
अध्याय -१९ वा, कविता -१२ वी
___________________________
भाद्रपद शुद्ध पंचमीला । गुरुवारी प्रहर दिवसाला । शके
अठराशे बत्तीसला । साधारण नाम संवत्सराला ।।१।।
जय गजानन शब्द भला । या थोर महात्म्याने उच्चारला ।
आणि लीन झाला । जन हो, शेगावला ।।२ ।।
वृत्त सर्वत्र पसरले । स्वामी समाधिस्थ झाले । लोक धावू लागले । स्वामींच्या दर्शना ।३।।
का आम्हांसी सोडिले । स्वामी, भक्त शोकाकुल झाले ।
आमचे छत्र आज गेले । करावे काय आम्ही आता ? ।।४।।
शिष्यांनी, भक्तांनी ठरविले । आपण घाई करणे ना चांगले ।
भक्तांना पाहिजे घडले । दर्शन स्वामींचे ।। ५ ।।
समाधी विधीसाठी थांबले । भक्तांना येऊ दिले । मग,पार पडले विधी समाधीचे ।। ६।।
ऋषी पंचमीला । अपार मेळा जमला । आले लोक शेगावला। स्वामींच्या दर्शना ।। ७।।
स्वामींची मिरवणूक निघाली । शेगावात फिरवली । गर्दी रथाच्या भवताली । सतत होती ।।८।।
पहाट उजाडली । मिरवणूक मठात आली । स्वामींची मूर्ती ठेवली । नेऊन, समाधीच्या जागेवरी ।।९।।
रुद्राभिषेक झाला । पंचोपचार विधी झाला । गजर गजानन नामाचा केला। शोकाकुल भक्तांनी ।।१०।।
मीठ अर्गजा अबीर । यांनी ती भरली गार । शिळा लावूनी
केले द्वार । बंद, शेवटी हो ।। ११।।
भक्त, लोक येती मठाला । स्वामींच्या प्रसादाला । वंदन करिती स्वामी समाधीला । भक्तिभावाने ।।१२ ।।
********
।। इति अध्याय -१९ ।।
*****************************
अध्याय २० वा आता होईल सुरू..
करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास
___________________________
कवी अरुणदास ” अरुण वि.देशपांडे – पुणे.
——————————————
