शिधापत्रिका ऑनलाईन करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांनी आपली शिधापत्रिका ऑनलाईन करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे यांनी केले आहे.
सर्व शिधापत्रिका ऑनलाईन करण्याचे शासनाचे निर्देश असून “आयुष्यमान भारत कार्ड” योजनेकरिता शिधापत्रिका ऑनलाईन असणे अनिवार्य आहे. या योजनेकरीता सर्व शिधापत्रिकाधारक पात्र असून जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिका ऑनलाईन करावयाच्या आहेत. परंतु अद्याप पर्यत सर्व शिधापत्रिका ऑनलाईन झालेल्या नाहीत. सर्व शिधापत्रिका धारक (NPH,केशरी, शुभ्र) यांनी आपली शिधापत्रिका ऑनलाईन करण्याकरीता संबंधित तहसिलदार कार्यालय, शासनाची rcms.mahafood.gov.in या वेबसाईट वरील पब्लिक लॉगीनचा वापर करुन किंवा CSC सेंटर मध्ये संपर्क करुन शिधापत्रिका ऑनलाईन करावयाची आहे. आपली शिधापत्रिका ऑनलाईन झाल्यानंतरच आपल्याला “आयुष्यमान भारत कार्ड” योजनेचा लाभ घेता येईल.
सर्व शिधापत्रिकाधारकांनी आपली शिधापत्रिका ऑनलाईन करुन घ्यावी तसेच सर्व रास्त भाव दुकानदार यांनी आपल्या रास्त भाव धान्य दुकानातील सर्व शिधापत्रिका ऑनलाईन करुन घ्याव्यात. असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
