You are currently viewing सलाम मुंबई फाऊंडेशनची राज्यस्तरीय बाल परिषद उद्या…

सलाम मुंबई फाऊंडेशनची राज्यस्तरीय बाल परिषद उद्या…

वालावल व वेतोरे हायस्कूलच्या विद्यार्थींनी विचारणार थेट प्रश्न

कुडाळ

तंबाखू मुक्त शाळा व समाज या ध्येय धोरणानुसार महाराष्ट्रातील यंग लीडर्स निर्मित हक्काचे व्यासपीठ ठरणाऱी व सलाम मुंबई फाऊंडेशनने आयोजित केलेली राज्यस्तरीय बाल परिषद गुरुवार दि. ११ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० ते १२ या वेळेत ऑनलाइन होणार असून जिल्ह्यातील वालावल हायस्कूलची सई मनीष धांडे व वेतोरे हायस्कूलची गायत्री पुरुषोत्तम नाईक थेट सिंधुदुर्गातून अधिकारी वर्गांना प्रश्न विचारणार असून या प्रश्नांना आरोग्य, शिक्षण, संरक्षण, माध्यमे यांचे अधिकारी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत. तंबाखूमुक्त आणि आरोग्यसंपन्न मुले हा मुख्य या राज्यस्तरीय बाल परिषदेचा उद्देश आहे अशी माहिती सलाम मुंबई फाऊंडेशनच्या वतीने देण्यात आली आहे . राज्यातील १३ जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांची मिळून ही बाल परिषद होत आहे. या परिषदेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. साधना तायडे ( संचालक, आरोग्य विभाग, महाराष्ट्र) दिनकर टेमकर (संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र) दिनेश डोके ( अतिरिक्त आयुक्त, सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र) विजयकांत सागर ( पोलीस उप आयुक्त, मीरा भायंदर, महाराष्ट्र)डॉ कृष्णा मेहतेकर ( उप संचालक, एफ, एस. एस. ए आय) डॉ. संतोष जाधव (कार्यक्रम अधिकारी, आकाशवाणी) हे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.गेले दोन अडीच महिने तेरा जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील निवडक लीडर्स मुलांसाठी तंबाखू विरोधी जागृती तसेच विविध नेतृत्व व कौशल्याधारित ऑनलाइन सत्रांद्वारे विशेष प्रशिक्षणे सुरू आहेत. शिक्षण विभाग व सलाम मुंबई फाऊंडेशन यांच्या वतीने याचे आयोजन केले आहे. सलाम मुंबई फाऊंडेशन २००७ पासून तंबाखूमुक्त व आरोग्यसंपन्न मुले यासाठी कार्यरत आहे.शाळा व गाव स्तरावर प्रशिक्षणे घेत दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी बाल परिषदेचे आयोजन मोठ्या शहरात करण्यात येते. यावर्षीची बाल परिषद कोरोना संकटामुळे ऑनलाइन होत आहे. संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या (कुडाळ) संगणक प्रयोगशाळेतून हे विद्यार्थी बालपरिषदेमध्ये दृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार आहेत. सलाम मुंबई फाऊंडेशनचे मास्टर ट्रेनर भाग्यविधाता वारंग, डॉ अनिल नेरुरकर तंबाखू प्रतिबंध अभियानचे परशुराम परब तसेच जिल्ह्यातील निवडक शिक्षक, विद्यार्थी यामध्ये सहभागी होणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा