You are currently viewing दोडामार्गात ओबीसी व व्हीजेएनटी पदनियुक्ती संदर्भात शिवसेनेची आढावा बैठक

दोडामार्गात ओबीसी व व्हीजेएनटी पदनियुक्ती संदर्भात शिवसेनेची आढावा बैठक

दोडामार्गात ओबीसी व व्हीजेएनटी पदनियुक्ती संदर्भात शिवसेनेची आढावा बैठक

दोडामार्ग :

आगामी निवडणुका व ओबीसी तसेच व्हीजेएनटी प्रवर्गातील पदनियुक्ती संदर्भात शिवसेना दोडामार्ग तालुका कार्यालय येथे एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीस ओबीसी व व्हीजेएनटीचे प्रदेश उपाध्यक्ष मा. श्रीधर पेडणेकर, जिल्हाप्रमुख श्री. सुरेश झोरे, महिला जिल्हाप्रमुख मा. वर्षाताई कुडाळकर, ममता झोरे, जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी, जिल्हा संघटक कानू शेळके, तालुकाप्रमुख रुपेश पिंगुळकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत आगामी निवडणुकांची तयारी, संघटनात्मक मजबुती, स्थानिक स्तरावर पदनियुक्तीचा आराखडा व ओबीसी-व्हीजेएनटी समाजातील प्रतिनिधित्व वाढविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच सोशल मीडियाच्या प्रभावी वापरावरही भर देण्यात आला.

या बैठकीस जिल्हा सोशल मीडिया प्रमुख विराज वेटे, तालुका संघटक गोपाळ गवस, महिला तालुकाप्रमुख चेतना गडेकर, दिव्या दळवी, बबलू पांगम, संतोष झोरे, उमेश सातार्डेकर, अमरसिंग राणे, भगवान गवस, रामदास मेस्त्री, लाडू आयनोडकर, सुनील गवस, सगुण नाईक यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसेनेच्या आगामी रणनीतीसाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली असून, स्थानिक पातळीवर संघटन अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आला आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा