You are currently viewing बोर्डवे रेल्वे स्टेशनसाठी दशक्रोशी संघर्ष समितीचा इशारा; दिवाळीनंतर उपोषण आणि रेल रोकोची शक्यता

बोर्डवे रेल्वे स्टेशनसाठी दशक्रोशी संघर्ष समितीचा इशारा; दिवाळीनंतर उपोषण आणि रेल रोकोची शक्यता

बोर्डवे रेल्वे स्टेशनसाठी दशक्रोशी संघर्ष समितीचा इशारा; दिवाळीनंतर उपोषण आणि रेल रोकोची शक्यता

बोर्डवे :

बोर्डवे रेल्वे स्टेशनसाठी मागील वीस वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाला वेग देण्यासाठी दशक्रोशी संघर्ष समितीच्या वतीने दिवाळीनंतर केव्हाही संबंधित प्रशासनाला आगाऊ सूचना देऊन उपोषण आणि रेल रोको आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या मागणीसाठी वेळोवेळी मंत्र्यांना निवेदने, भेटीगाठी, आंदोलने आणि विविध पातळ्यांवर प्रयत्न झाले असतानाही अपेक्षित निर्णय झालेला नाही. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांच्या आशा खासदार नारायण राणे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्यावर केंद्रित झाल्या आहेत. त्यांनी या प्रश्नात लक्ष घालून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा समितीकडून देण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा