You are currently viewing दरवळाया लागली शांतता

दरवळाया लागली शांतता

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ मानसी पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*दरवळाया लागली शांतता* 

 

दरवळाया लागली ही शांतता,

मनात दाटून येई व्याकुळता .

 

स्मृतींच्या पानांवरी हळवी ओल,

डोळ्यांत साचलेले‌ प्रांजळ बोल.

 

वाऱ्याच्या स्पर्शात दडलेले गीत,

आठवांचे जागणे जुनीच रीत

 

आभाळही थांबले नि:स्तब्ध‌ दाट

मनास गवसे भाव विलक्षण वाट

 

वेळेच्या काठावर थरथरती ओढ,

शब्दांविना सांगते मनातील‌ गूढ

 

दरवळती आठवणी, विसरलेले क्षण,

शांततेच्या गर्भी दडलेले स्पंदित कण

 

 

*©️®️ डॉ सौ. मानसी पाटील*

‌‌मुंबई

प्रतिक्रिया व्यक्त करा