You are currently viewing सिंहगडावर डौलणार 100 फूटी भगवा

सिंहगडावर डौलणार 100 फूटी भगवा

हिंदवी स्वराजाचा साक्षीदार किल्ले सिंहगडावर सुमारे 100 फुटी भगवा ध्वज उभारणे, विद्युत रोषणाई आणि अन्य सुशोभिकरणाच्या कामाला स्थायी समितीने मंगळवारी मंजुरी दिली. ध्वज आणि विद्युत रोषणाईसाठी 1 कोटी रुपये आणि नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळाबाहेरील सुशोभिकरणासाठी 74 लाख रुपये खर्च करण्यात येईल.

स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी याविषयी माहिती दिली. सन 2020-21 या आर्थिक वर्षांत महापालिका अंदाजपत्रकात आमदार भीमराव तापकीर यांच्याकडून महापालिकेच्या अंदाजपत्रकात जी 1 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यातून हे काम करण्यात येणार आहे. हा किल्ला पुरातत्त्व विभागाच्या आणि वन विभागाच्या ताब्यात असल्याने या प्रकल्पासाठी राज्य सरकारने पूर्वीच ‘मास्टरप्लॅन’ तयार केला आहे.

सुमारे 30 मीटर उंचीचा (फाउंडेशन धरून सुमारे 100 फूट) हा ध्वज असणार आहे. हा ध्वज भगवा असेल.

हद्दीबाहेर होणार खर्च..

अंदाजपत्रकातील निधी महापालिका हद्दीबाहेर खर्च करायचा असेल, तर एकूण सदस्यांपैकी निम्म्या सदस्यांची त्याला मंजुरी असणे आवश्‍यक आहे. तसेच या कामासाठी राज्यसरकारच्या विविध खात्यांची परवानगी आणि ना-हरकत घेणे आवश्‍यक आहे. यामध्ये पुरातत्त्व विभाग, वन खाते यांचा समावेश आहे. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल. तसेच याला मुख्यसभेचीही मंजुरी घेणे आवश्‍यक आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा